Friday, November 20, 2009

नवकवी …..

नवकवी …..


दुर्मिळ तुझा केशसंभार असा,


लोंबल्या पायापर्यंत जटा,


सौंदर्याची ही ओळख खरी,


सांगतो मी नवकवी जरी ,


त्यात गालावर तीळ तुझ्या ,


ठेवी दूर वाईट नजरेला,


निसर्गानीच घेतली ही काळजी,


नजर कोणाची न लागो तुला

!!!!!!!!!गरुडाचं पोर!!!!!!!!!!

!!!!!!!!!गरुडाचं पोर!!!!!!!!!!

गुनी मोठं, थोर व्हतं,
लेकरु त्या, 'आईचं'......!,
अंगी बळ, अन पाठबळ,
महादेवाच्या, 'पायचं..........!

गरुडाचं पोर ते,
गरुडंच व्हनार ते,
रयतेचं भलं ज्यात,
तेच करणार ते,
भवानीचा अभय त्यासी,
कुना नाही भ्ययचं......,
गुनी मोठं, थोर व्हतं,
लेकरु त्या, 'आईचं'......!,
अंगी बळ, अन पाठबळ,
महादेवाच्या, 'पायचं..........!

सह्याद्रीचा वाघ व्हता,
गनीमासी धाक व्हता,
निश्चयाचा मेरु त्याचा,
गुरु रामदास व्हता,
संगे अभंगाचा गोडवा,
अन भजन तुका-रामचं......,
गुनी मोठं, थोर व्हतं,
लेकरु त्या, 'आईचं'......!,
अंगी बळ, अन पाठबळ,
महादेवाच्या, 'पायचं..........!


रयतेस लळा त्याचा,
रयतेत जिव त्याचा,
मावल्याची साथ डंका,
वाजविला स्वराज्याचा,
युक्तीने अन शक्तिने,
पुढे चित्त्यापरी जायचं......,
गुनी मोठं, थोर व्हतं,
लेकरु त्या, 'आईचं'......!,
अंगी बळ, अन पाठबळ,
महादेवाच्या, 'पायचं..........!

लोहगडची सफर

लोहगडला जाउ जाउ अस करत करत बरेच रविवार नुसतेच येत आणि जात होते.
प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी कारण. होय नाही करत शेवटी मी आणि राजा दोघच जायच फिक्स केल.
तर आता नमनालाच जास्त तेल न घालता घ्या फोटू.

हा जाताना पायवाटेवरुन काढलेला फोटु.

हा जाताना दिसणारा विसापुर. अवाढव्य आहे हा किल्ला.

हा दिसतोय लोहगड. हा त्याचा डावीकडचा भाग. बुलंद किल्ला आहे एकदम.

हा उजवीकडचा भाग. त्यातील सगळ्यात उजवीकडचा गोल बुरुज म्हणजे विंचु काटा.

लोहगडाच्या पायथ्यापासुन दिसणारा विसापुर

गडाच्या दरवाजाच्या बाजुला असलेली गणेश मुर्ती.

बुलंद लोहगड

हाच तो ढासळलेला बुरुज. Sad

मस्त आहे ना बांधणी त्या ढासळलेल्या बुरुजाचे काहि दगड दिसत आहेत पायर्‍यांवर.

मुख्य दरवाजातील नक्षी

पसरलेला विसापुर. लोहगडावरुन.

गडावरुन दिसणार धरणाच (बहुद्धा पवना धरण) बॅकवॉटर.

विंचुकाटा

विंचुकाट्यावरुन लोहगड असा दिसतो

सोळा कोनी तलाव. (नाना तलाव)

हल्ली गडावर बरच पब्लिक वाढलय. त्यामुळे कचरा देखील.
चार वर्षे झाली त्यावेळी अख्ख्या गडावर फक्त आम्ही ५ मित्र आणि एका शाळेतुन दोन मास्तरानी आणलेले २०-२५ मुल एवढीच लोक होतो.
कचरा दिसलाच नाही त्यावेळी.
त्यावेळी माकड जास्त दिसली होती. आता माकडं तुरळकच दिसली पण आधुनिक माकडं एफ एम लावुन फिरताना गडावर जास्त दिसलीत. बहुतेक लोणावळ्याकडुन गडाकडे येणारा रस्ता बराच सुस्थितीत आलेला असावा. त्याशिवाय एवढी गर्दी शक्यच नाही. असो.
लोहगडाचा पुर्ण सिंहगड व्हायच्या आधी एकदा तरी जावुन या. सुख आहे त्यात.
जास्त दमछाक करणारा गड नाही हा.

Friday, September 25, 2009

पेग

सबंध काय म्हणता राव, अर्धी फार झाली

चला उठा आवरा आता, गर्दी फार झाली

नोकरी, बिझनेस आणि इलेक्शन सुध्दा झाली

आपण उस्ताद कधी होणार, शागिर्दी फार झाली

निष्ठा, बायको आणि इस्टेट, दोन दोन प्रत्येकी

दोन्ही कशा व्हाईटला ठेवू, एखादी फार झाली

उद्योग करुन इतके जरी भिजलो पैशाच्या पावसात

झोप तेवढी येत नाही हो, सर्दी फार झाली

वर स्वर्गात पुण्य पाहिजे, नायतर तिकडे जागा नाय

जास्त काय करायला नको, आर्ती फार झाली..

बास हो बास….

बेवड्या देवाची दुनिया बुडणार, वर्दी फार झाली

चला उठा आवरा आता, गर्दी फार झाली..

हे प्रेम आहे की मैत्री.....

हे प्रेम आहे की मैत्री.....
तुला काय वाटते........

तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........
पण शब्द चुकण्याची भीती वाटते............

तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........
पण विरहाची भीती वाटते.....................

तुझ्या सोबत चालावेसे वाटते.................
पण रस्ता चुकण्याची भीती वाटते............

तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.........
पण पापण्या मिटण्याची वाटते...............

तुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते...............
पण मिठी चुकण्याची वाटते...................

तुझ्या सोबत आयुष्यभर जगावेसे वाटते.....
पण तुझ्या आई-बाबाची भीती वाटते.........

आता तुच सांग सखी...........................
हे प्रेम आहे की मॆत्री............... तुला काय वाटते.......................

तुला जेंव्हा माझी गरज भासेल...............

तुला जेंव्हा माझी गरज भासेल,
आज जरी तुला माझी गरज नसली,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,
तुला नवा मित्र मिळाला जरी असेल,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,

कबूल आहे माझे प्रेम होते तुझ्यावर,
मैत्री असे नाव होते त्याला नेहमी,
तुला जेंव्हा माझी गरज भासेल,
तेंव्हा फक्त मनोमनी हाक मार,
मी धावत फक्त तुझ्यासाठी येइल,
कारण तेंव्हा ही मी तुझाच राहिल,

कदाचित मी नव्हतोच कधी तुझा,
मी होतो फक्त माझाच माझा,
नंतर समजले मी झालो होतो तुझा,
तोवर तू राहिली कुठे होतीस माझी,
नवा पुरता राहिली मैत्रिण माझी,

आज जरी तुला माझी गरज नसली,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,
तुला नवा मित्र मिळाला जरी असेल,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,

सत्य आणि सुविचार

1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो
अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा
मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने
बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो


सुविचार
१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं

कळतय मला हे बर नाही...

मन भरून येन, अस सतत झुरन
डोळ्या पानी येन, अस नेहमीच होण
कळतय मला हे बर नाही...

किती दिवस अस उदास राहणार
स्वताचे सुख दुसरयात शोध नार
कोणाची तरी वाट पाहणार..
त्या वाटे वर तर काहीच चाहुल नाही..

हसता हसता मधेच थांब ने
सगळ्यात असून एक्ट वाटने
सततची ही आठवण येणे..
ज्याच्या साठी झुराव त्याला तर
कश्याचाच पत्ता नाही..

का म्हणून कुणाची अशी वाट बघाव,
का कुणासाठी अस सतत झुराव
आपल मन तरी आपल्या ताब्यात असाव...
कुणाच्या असण्याचे ते बांधील नाही...

ठरवून हव तर मनसोक्त हसाव ...
नाहीच जमल तर भरपूर रडून घ्याव्..
कोणाशी तरी मनसोक्त बोलाव..
नसेल कोणी तर लिहित बसाव..
मग मात्र
दुःखाचे गाठोडे घट्ट बान्धाव..
दूर पाण्यात फिरकाउन दयाव..
की पुन्हा ते परत येणारच नाही..

अजूनही पुढे किती वाटा आहेत..
जग न्यासाठी नविन कारण आहेत..
आजुबाजुला बघा किती मानस आहेत...
आपल्याला जपणारी नाती आहेत..
आपल्याला जीव लावान्यारानहुन
मोलाच या जगात कोणीच नाही..

काल जेव्हा तू अचानक फ़ोन केलास...

काल जेव्हा तू अचानक फ़ोन केलास...
कशी आहेस म्हणालास...
मी काय बोलणार होते...
खर कस सांगणार होते..
मग म्हणाले मी मजेत आहे रे...
ते जाऊ दे तुझ कस चाललय रे..
तू म्हणालास मी ही बिंदास्त आहे..
आजकाल कामत जरा जास्तच व्यस्त आहे..
मग बराच वेळ आपण बोलत होतो...
घरच्यान बद्दल, ऑफिस बद्दल,
नविन पाहिलेल्या सिनेमा बद्दल...
अगदी पूर्वी सारख हसत हसत...
एकमेकांना चिडवत होतो...
मनात चाललेले वादल,
कसे बसे डोळ्यात थाम्बवत होतो...
एकमेकांच्या मनाची,
हळूच चाहुल घेत होतो..
तूझा क़तर झालेला आवाज
आणि तोलून मापून बोलण..
मी कशी आहे याचा
हळूच कानोसा घेन..
दोघांनाही ठाउक होत
आपण वर वरच हसतोय..
समोरच्याला कलु नये..
म्हणुन नाटक करतोय..
मग मधेच थाम्ब्लास,
थोड्या वेळाने म्हणालास..
लग्नाची तारीख ठरली..
हॉल ठरला सगळी तयारी झाली..
अजुन ही बरीच काम पेंडिंग आहेत..
पण घरचे सगले खुश आहेत..
मग हळूच म्हणालास येशील न,
माझ्यासाठी दिवस तूझा राखशील न?
मी म्हणाले नक्कीच येइन,
इयर एंड आहे पण प्रयत्न तरी करीन
मग कधीतरी तू फ़ोन ठेउन दिलास,
आणि पुन्हा एकदा मानसं च्या गर्दित,
मला एक्ट करून गेलास...
काल जेव्हा तू अचानक फ़ोन केलास...

मैत्री करत असाल तर

मैत्री करत असाल तर
पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा

मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा..!!!

माझी ही एक मैत्रीण होती

माझी ही एक मैत्रीण होती,
खुप शांत अन अल्लड स्वभावाची,
कधीतरी यायची लहर तेव्हा ती,
लाजून गालातल्या गालात हसायची..
मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,
असं ती सुमधूर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,
ती अचानक गप्प होऊन जायची..
बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,
ती त्या फुलांना आवडायची,
फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,
आनंदाने बागडायची…


तिच्यासोबत चालता चालता,
वाटही कमी पडत असे,
तिच्या सहप्रवासात नेहमीच,
वाट पावलांनाच संपताना दिसे…

अशी काहीशी ती मला खुप आवडायची,
रोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,
तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..

एकदा असचं तळ्याकाठी बसून,
तिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,
विस्कटू नये म्हणून तरंगाना,
शांत रहा म्हणून सांगत होतो…

तेवढ्यात तिने मला विचारलं,
आज काय झालं आहे तूला?
मी उत्तरलो माहित नाही पण
मला काहितरी सांगायचे आहे तूला..

तुझी दृष्टी होऊन मला,
तुझं व्हायचं आहे,
तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरी चालेल,

पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..

दिवस येतात दिवस जातात...

दिवस येतात दिवस जातात... काही पटकन तर काही रेंगाळत राहतात...
मलभ भरून यावे तसे डोले भरून येतात..दिवस येतात दिवस जातात... काही पटकन
तर काही रेंगाळत राहतात...

कुठे अशशील कसा अस शील सारखे तेच प्रश्न
उगाच मग मोबाइल ची बटने दाबत बसन
अशावेळी आजू बाजूला काय चाललय याचे भान कोणाला राहतय...
दिवस येतात दिवस जातात... काही पटकन तर काही रेंगाळत राहतात...

काल अचानक लक्षात आले... तुला engage होउन चक्क ६० दिवस झाले..
या इतक्या दिवसात तुझ्या साठी किती वेळा वाहिले रे आसू
अजुन ही मी शोधते आहे त्या दिवशी माझे मालावलेले हसू..
मग लक्षात आले
तुला विसरु विसरु म्हणता म्हणता आज ही सगळ्याच आठवणी जपल्यात..
दिवस येतात दिवस जातात... काही पटकन तर काही रेंगाळत राहतात...

निर्णय ही सगळे तुझेच आणि आता सुखही सगले तुझे..
कुठे शोधू किनारा आता इथे काय राहिले रे माझे...
एकत्र आलेल्या वाटा अचानक अशा का समांतर होतात??
दिवस येतात दिवस जातात... काही पटकन तर काही रेंगाळत राहतात...

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...
ती म्हणाली होती प्रेम आहे माझे तुझ्यावर
नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा

माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे
न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे

कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कान
पावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान

कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव

कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले

कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला

कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर

कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले
ती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढ

आता मात्र शब्धही लागतात अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?

पण आता कळतयं....
प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे
आपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमंणे

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...
प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

तरी मी तुझाच आहे .......................

तू किती ही नाही म्हटलेस
तरी मी तुझाच आहे
तुझ्या नकारालाच मी होकार समजतो
तरी मी तुझाच आहे


लहानपणापासून प्रेम करतोय
अभ्यास कितीतरी वेळा थांबला
त्या वळणावरच्या चिन्चेखलि
हा जीव कितीतरी वेळा थांबला

प्रेम माझे तुला कळलेच नाही
कितीतरी वेळा उपास केला
आई बाबा चिडून म्हणायचे
असा कसा पुत्र देवपणाला लागला

दुपारच्या सुट्टीत बाहेर जाऊन
चिंचेचा खिसा तुझ्यासाठी भरायचा
नेहमीच तुला द्यायला जाताना
पण हा जीव घाबराघुबारा व्ह्ययचा

कॉलेज मध्ये नेहमीच
नजर तुला शोधत असायची
पण तुला कुठे समजायचे
तू तुझ्याच गुर्मित असायची

म्हटले एकदा तरी
डेरिंग करून विचारायची
पण डेरिंग करता करतच
तू डोळ्यापुढून जायची

शेवटी असाच एक दिवस तो
योगायोग मला आला
आणि त्या क्षणलाही
तू सहज नकार दिला

दोन दिवस जेवलॉ नाही
घरचे सगळे टेन्षन मधे पडले
आणि खरोखरच दोन दिवस
माझे ओरिज्नल उपास घडले

पण तिसर्‍या दिवशी मला
रहवलेच अजिबात नाही
ती तर नाही म्हणाली
एका भाकारित भागलेच नाही

अग मला माहीत होत
तुझा होकार कधीच नसणार
तरिपन मी असतसा
कधीच नाय गप बसणार

तू किती ही नाही म्हटलेस
तरी मी तुझाच आहे
तुझ्या नकारालाच मी होकार समजतो

ती येईल परत कदाचित...........

एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची

होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी

पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत

त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही

डोळ्यात ह्या अष्रु
कधी तरळलेच नाहीत

ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही

हसाय्च्याही आधी खुप
वेळा विचार करेल हे मन

आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही

असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना

आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...........

सांगा कुठ्वर झेलीत घावं ????????

अनावर भावनांना कसं
मनामध्ये कोंडाव ?
कसं ओथंबलेल्या अश्रूला
पापणी आड दडवावं ?

"तुला बघताच मन भरून येत"
हे कसं त्याला सांगाव ?
ह्र्दय तुटून पाझरताना
कसं गीत सुखाच गावं ?

सांगा कुठ्वर झेलीत घावं,
मी मुखवटी हास्य हसाव ?
अन वेदनांना नाकरून का
उगा स्वत: फ़सवाव ?

मनातल सारच शब्दात
मी सांगा कसं मांडावं ?
काहि समजून घ्यावं त्याने
अन मन हलकेच उघडत जाव.....................

काहि समजून घ्यावं त्याने
अन मन हलकेच उघडत जाव

कुणाची अशीही सोबत असू नये

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे

पण,पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसाव
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी


कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

Monday, September 14, 2009

Vinod

उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.

प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम

म्हणून ओळखत.
------------ --------- ---------

प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने

दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.

खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तर- ग्लास काळा होईल.

मराठीत भाषांतर करा.

चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात

खाली डोकं, वर पाय !

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

काहीजण मैत्री कशी करतात?

उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे प्रत्येकाला...हवा असणारा मोहक वारा
मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग ...........................

मैत्री

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री

मैत्रिण

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!

मी कोण?

मी कोण?
मी एक थेंब.......
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा........

ती मुलगी मराठी असते

company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

collage मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

office मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

collageमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते

एक होता काऊ अन्‌ एक होती चिऊ

एक होता काऊ अन्‌ एक होती चिऊ,
काऊचं घर होतं शेनाचं, चिऊचं घर होतं मेनाचं.
एके दिवशी काय झालं, खूप मोठ्ठा पाऊस आला.
त्यामुळे काऊचं शेनाचं घर पावसामध्ये वाहून गेलं.

मग काऊ चिऊकडे आला आणि म्हणाला...
चिऊ-चिऊ दार उघड
चिऊ म्हणाली: थांब मझ्या लेकराला आंघोळ घालू दे
चिऊ-चिऊ दार उघड
...थांब मझ्या लेकराला साबण लावू दे
चिऊ-चिऊ दार उघड
...थांब मझ्या लेकराला...............
चिऊ-चिऊ दार उघड
...थांब मझ्या लेकराला...............
.
.
.
.
.
दिवस सरले, महिने सरले, दार काही उघडलं नाही
रात्रं-दिवस वाट बघण्याशिवाय, दुसरं काहीच घडलं नाही...
पावसाळा बेभान कोसळत रहिला, काऊ तसाच भिजत राहिला
चार-दोन पानांच्या आडोशाला, पंखात चोच खुपसून निजत राहिला...

गार वाऱ्याच्या झुळका घेऊन मग हिवाळा आला,
काऊने त्याचा शेनाचा बंगला पुन्हा नव्याने सारवला...

उन्हाळ्यात मात्र चिऊची तारांबळ उडाली,
मेनाची तिची झोपडी हळू-हळू वितळू लागली...
तेव्हा, पिलांच्या जीवाचे तिला भिऊ वाटले,
आधारासाठी तिने मग काऊचे घर गाठले...

चिऊची चाहूल दूरूवरूनच त्याच्या कानावर पडली होती,
तिने हाक मारण्याआधिच काऊने दारं उघडली होती...
चिऊने कौतुकान ..............................
......................

कॉलेज लाइफ़

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..

कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...

नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा

कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............!

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा.............!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा,
अगदी माझ्यासारखा ................

आयुष्य असचं जगायचं असतं............

आयुष्य असचं जगायचं असतं
जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

दु:ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


आयुष्य असचं जगायचं असतं............

गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे

1. तुम्ही कोणाही मुलीला बिंधास्त निरखू शकता.

2. तुमचा तिच्यावर खर्च होणारा पैसा वाचतो.

3. अभ्यासावर लक्ष केंदित होऊ लागल्याने परीक्षेत तुम्हाला बरे मार्क मिळू लागतात.

4. इमोशनल ब्लॅकमेलिंग केले जाण्याचा धोका संपतो.

5. गर्लफ्रेंडच नसल्याने तिने 'डिच' करण्याचा प्रश्न् उरत नाही.

6. फोनच्या रिंगपेक्षा महत्त्वाचे असे आयुष्यात बरेच काही असते, याचा साक्षात्कार होईल.

7. तुमच्यासाठी चांगले-वाईट काय हे दुसऱ्या कुणीतरी ठरवण्यातून तुमची मुक्तता होईल.

8. तुम्ही आयुष्यातल्या अन्य व्यक्तींसाठीही (उदाहरणार्थ आई, बाबा, बहीण, भाऊ) भेटवस्तू घेऊ शकाल.

9. प्रेमपत्र-सत्र थांबल्याने कागद वाचेल, त्यामुळे काही झाडे वाचतील.

10. रड्या प्रेमकथांऐवजी अक्शन फिल्म पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल.

11. थापांच्या पापातून सुटका होईल.

12. स्वप्नांचा 'व्यत्यय' संपल्याने झोप छान लागेल.

13. टेलिफोन बिल कमी तर होईलच, शिवाय ते सगळ्यांपासून लपवावे लागणार नाही

Saturday, September 12, 2009

लग्नापूवीर्...

लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...

लग्नापूवीर्...

तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.

ती : मी जाऊ का निघून?

तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.

ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?

तो : अर्थातच!

ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?

तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?

ती : तू माझं चुंबन घेशील?

तो : हो तर.

ती : तू मला मारहाण करशील?

तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.

ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?

तो : हो.

लग्नानंतर...

लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही... फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा !

मुली लग्न का करतात............ . .....

1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी........

2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......

3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून.........

4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी............ .....

5) आई-बापावर दया करण्यासाठी.......

6) मैत्रिणीने केले मग मी का नको ...........?

7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून..........

8) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून............ ......

9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार............ ....

10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . .

11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे............ फअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय म्हणून............ .........

आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जम

निबंध लिहा : विषय - 'गाय'

निबंध लिहा : विषय - 'गाय'
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात. भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते. गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात. मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते. गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो. गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीलाताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसुबारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते. पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते.
गाईला माता म्हणतात.
भारत माता की जय!" .

आई साठी नक्की वाचा ही कविता

आई साठी नक्की वाचा ही कविता
ही कविता हिंदीतील आहे.
"नारायण सुर्वे" ह्यांनी ह्या कवितेचे मराठीत भाषांतर केले आहे.
"जितेंद्र जोशी" ह्यांनी ही कविता "झी मराठी" वर झालेल्या "स्वरतरंग" ह्या कार्यक्रमात सादर केली होती.
आवडल्यास जरूर प्रतिक्रिया नोंदवावी.


हंबरून वासराले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं...दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

आया बाया सांगत व्हत्या,व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा
पीठामंदी.....पीठामंदी
पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय..
तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं....दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

कण्या काट्या वेचायला मायं जाई रानी
पायात नसे वाहन तिझ्या,फिरे अनवाणी
काट्याकुट्या...रं काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायं
तवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं... दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले...........

बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनं
बास झालं शिक्षाण आता,होऊदे हाती कामं
आगं शिकूनं शानं...गं शिकूनं शानं
शिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं....दिसत

काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

पोरीने नेलं काळीज चोरून!!!!!!!!!!!!!!
नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून...
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

पाहताच तिला मी एकदम क्लीन बोल्ड झालो...
एप्रिल च्या कडकडीत दुपारी आय ऍम सो कोल्ड झालो!
भूक हरवली, झोप उडाली झालो दिवाना तिज पाहून...
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

व्हॅलेंटाइन्सला ठरवलं, तिला सांगू मनातली गोष्ट...
पण दुर्भाग्य माझं असं की तिचे भाऊ होते फार धष्टपुष्ट!
गोष्ट राहिली बाजूलाच, आणि आलो मी हनुमान होऊन...
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

मी ही हार मानणारा नव्हतो म्हटलं शोधू नवा मार्ग...
तडक जाऊन मग शोधून काढला मी एफवायबीएससी चा वर्ग!
जे काही पाहिले ते पाहतंच राहिलो डोळे विस्फारून...
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

विश्वास बसता बसेना की ती वर्गासमोर उभी होती...
एफवाय च्या वर्गाला ती 'सी प्रोग्रॅमिंग' शिकवत होती!
जिच्यावर लाईन मारत होतो आलो तिलाच मॅडम म्हणून...
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

मैत्री...!

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!

सखे मी तुला काय आणु ? सहज एक दिवस विचारल तिला

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्‍याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवाय
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत

मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?


--
शशि गराडे

दोरी ..........................

एक मुलगी होती मनाने खूप चांगली
पण नशिबाने तिच्याशी क्रूर थट्ट मांडली

तिने ज्याच्यात पाहिले भविष्याचे चित्र
तो म्हणाला आपण राहू नुसते मित्र

मग तिला वाटले जगणे आता संपले
वाढण्या आधिच आनंदाचे रोप माझे खुंटले

मग तिला लागला एकटे राहण्याचा छंद
आपल्याच कोषात तिने केले स्वतःला बंद

एकदा एक मित्र तिला अडवून म्हणाला
काय हरवले? का बांधलेस का असे स्वतःला?

तू गमावलास व्यक्ती ज्याचे प्रेम तुझ्यावर नव्हते
त्याने गमावले प्रेम तुझे जीवापाड जे होते

हे ऐकताच ती हसली, विचार करत बसली
स्वतःच घातलेल्या बंधनांची दोरी हळूच सुटली

--
शशि गराडे

उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही !

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिआ दूर जाई
भूर भूर भूर भूर

गदड निळे

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

-बा. भ. बोरकर.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त थैमान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदच्युता ,तव भिषन नर्तन असेच चालु दे
फ़ुटुदे नभ माथ्यावरती
आणि , तुटुदे अखंड ऊल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकार्यानो, का हि खंत जन्म खलाशाचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया लोटले
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि सुखे , कशासाठी
जपावे पराभुत प्राणा

कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा ना रोधु शकतिल ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशान मिरवू महासागरात
जिंकु खंड खंड सारा !

चला उभारा श्रुभ शिडे ति गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
? अनंत आमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ?

.........कुसुमाग्रज

या बाई या…

या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया......१

ऐकून येते,
हळुहळु अशि माझी छबि बोलते.......२

डोळे फिरवीते,
टुकु टुकु कशी माझी सोनि बघते......३

बघा बघा तें,
गुलुगुलु गालांतच कशी हंसते......४

मला वाटते,
हिला बाई सारें काही सारे कळते......५

सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे वळते......६

शहाणी कशी!
साडिचोळी नवी ठेवि जशिच्या तशी......७

कवि: दत्तात्रय कोंडो घाटे

फुलपाखरे

धरू नका ही बरे
फुलावर उडती फुलपाखरे

मजे मजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे
फुलांवर उडती फुलपाखरे।

हात लावता पंख फाटतील
दोरा बांधून पायही तुटतील
घरी कशी मग सांगा जातील
दूर तयांची घरे
फुलावर उडती फुलपाखरे॥

-अ. ज्ञा. पुराणिक

बाळ जातो दूर देशा

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासुन
हात लागेना कामाला, वृत्ति होय वेडयावाणी
डोळ्यांचे ना खळे पाणी
आणा दूध जिन्सा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला
त्याच्या आवडीचे चार, करू पदार्थ सुंदर
कांही देऊ बरोबर
त्याचे बघा ठेविले कां, नीट सामान बांधून
कांही राहील मागून
नको जाऊ आतां बाळा, कुणा बाहेर भेटाया
किती शिणविसी काया
वार्‍यासारखी धांवते, वेळ भराभरा कशी!
गाडी थांबेल दाराशी
पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस
उंच भरारी घेवुन, घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिलापाशी
बाळा, तुझ्याकडे माझा, जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील
बाळ जातो दूर देशा, देवा! येऊन ऊमाळा
लावी पदर डोळ्याला!

-गोपीनाथ

अस्सल लाकूड, भक्कम गाठ

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांदयावरती सुतारांचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll

- वसंत बापट

क्रूस

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनी क्रुसावरचे
विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष -
"प्रेम, शांति अन् क्षमा यांमध्ये वसतो परमेश! "
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातांत
निःशस्त्रांच्या रक्तामांसामध्ये नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलांबायकांत
जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तीप्रद रीत!
पाचोळ्यापरी पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास!
असेल ही बा सैतानाची प्रभुवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजात!

- कुसुमाग्रज

प्रेम कर भिल्लासारखं

पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा मेघापर्यंत पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!

- कुसुमाग्रज

घाटातील वाट,

घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ.

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती.

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा.

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी.


कवयित्री - सरिता पदक

लतांनो सांगू का तुम्हां !

लतांनो सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार!
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार

तुम्हा कोठूनीया ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखशांती झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल भुकाया, जय श्रीराम श्रीराम

बघूनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे, झर्‍यांनो ध्याल ना पाणी
पहा ही अर्पीली कैसी, फळे या घोर वृक्षांनी

नव्हे कोठून ही उष्ठी, जरासी सावलेली ही
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पुनी, सुखे त्या पायी लोळेन
जय श्रीराम श्रीराम, जय श्रीराम श्रीराम

_ वा. गो. मायदेव

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे…

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक…

मैत्री तर आहे एक भक्कम इमारत ......

मैत्री तर आहे एक भक्कम इमारत ......
मैत्री कधीही कोमेजत नाही
कोमेजायला ती नाजुक फुल नाही

मैत्री तर आहे एक भक्कम इमारत
दोघांच्या विश्वासाच्या पायाने जाते उभारत

शुद्ध निखळ मैत्रीत असतो गोडवा
कोणीच नसतो मग तिकडे डावा - उजवा

शुल्लक कारणासाठी तुटते ती मैत्रीच नसते
समोरच्याला वाईटासकट स्विकारन्याची गरज असते

माणूस आहे...शेवटी चुका होणार
माफ़ी मागितली तरी तुम्ही ताणून धरणार

नाती - गोती आई वडिल यात निवड नसते
चांगले मित्र टिकवन्याची मात्र आपल्याला संधि असते

इक चुक लक्षात ठेवून इतर चांगल्या गोष्टी विसरणार
म्हणजे तुमच्या विश्वासाचा पाया नक्कीच डळमळीत असणार

नविन मित्र आयुष्यात सर्वांच्याच येतात
पण कोण कधी असे बोलते का...त्यामुले तू मला विसरलास

हे सर्व आरोप करताना थोडा तरी विचार करायचा
तुझ्या प्रत्येक शब्दाने समोरच्या मनाच्या ठिकर्या उड़त होत्या

ठिकर्या जरी उडाल्या तरी ती नाही रागावली
कारण तिच्या नावातच आहे ओळख मधुर प्रेमाची

मी हीरो माझ्या आयुष्यातला....

कोणी हीरो सिनेमातला.....कोणी खरा ..
कोणी खोटा...
कोणी हीरो तिच्या आयुष्यातला.
तर कोणी तुमच्या...
पण मी हीरो माझ्या आयुष्यातला....
सुख काय असता माहित नाही
कारण दुःख मोजत सारे आयुष चालले ...
पण जगण्याची माझी जिद्द खरी आहे.
आणि मनहुंच मी माझ्या आयुष्याचा हीरो आहे ..
ना नशिबाची साथ...
सतत कमरेत लात
तरीही 'कना' ताठ...
हे असच माझा जागना आहे
आणि मन्हुनाच मी माझ्या आयुष्याचा हीरो आहे.
एक हावी स्वप्नसुंदरी
अस सारख वाटत.
पण खरा तर ते फ़क्त
स्वपनात्च परवडता
माझा जागना मन्झे
स्वप्न आणि वास्ताव्तला खरा मेळ आहे
आणि मनहुंच मी माझ्या आयुष्याचा हीरो आहे.
दुस्रयांचा आदर्श होण्यापेक्षा
स्वताच स्वतः साठी आदर्श व्हा.
कारण खरा हीरो इथे प्रतेकत दडलाय
पण हेच कलायला मानसा
तुझा सारे आयुष खर्ची पडले
पण माझ्यासाठी तरी
मी माझ्या आयुष्याचा हीरो आहे....
--
शशि गराडे

आयुष्या

"लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!
किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!
देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!
विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""

तुला माहित आहे का ......

तुला माहित आहे का ......

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....
अंतर नेहमी वाढत जाते ......

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ....
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही .....
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......

आज आशा वाटेवर मी उभा आहे ..
समोर काहीच दिसत नाही ...
पण मागे फिरावे की नाही ..
हे ही समजत नाही .....


पण या वाटेवर चालत राहण्याचा ...
मी प्रयत्न करेन ....
तुझ्या सोबत न रहता , तुझ्या
मानत राहण्याचा प्रयत्न करेन ....


मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....
यात आकर्षणाचा भाग नाही ..
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ....

चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ..
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव .....
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ..
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे

तो मित्र वगळावा

जो आपल्याला नीट ओळ्ख्त नाही
तो मित्र बरा
पण आपल्याला ज्याची ओळखच नही
तो मित्र वगळावा.

जो आश्वसनं देत नही
तो मित्र बरा
पण जो खोटी आश्वसनं देतो
तो मित्र वगळावा.

जो आपल्या तोन्डावर बोलतो
तो मित्र बरा
पण जो आपल्यला पाठुन ढुसळ्तो
तो मित्र वगळावा.

मैत्री न वाढवता नुसतिच जपणरा
मित्र बरा
पण मैत्रीचे भाव नसतना मैत्री दाखवतो
तो मित्र वगळावा.


स्वप्निल..........

तुझे स्वप्न पाहतो.........


Monday, September 7, 2009

आम्ही मराठी!

मायक्रोसॉप्ट युरोपचा चेअरमन निवडण्यासाठी बिल गेटस् मोठ्या प्रमाणावर एक मुलाखत भरवतो. ५००० कँडिडेटस् या मुलाखतीसाठी हजर राहतात. आमचा मकरंद त्यातलाच एक!

बिल गेटस्: आपण मायक्रोसॉप्ट मध्ये ईच्छुक असल्याचे पाहुन आनंद झाला. आपण आल्याबद्दल आभार. आता, ज्यांना "जावा" माहित नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे. सुमारे २००० कॅडिडेटस् नाइलाज म्हणुन बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मला "जावा" येतच नाही. पण थांबलो तर काय जातयं? एक ट्राय तर मारु! आणि तो थांबतो.

बिल गेटस्: ज्या कँडिडेटस् ना १०० पेक्षा अधिक लोकांना मॅनेज करण्याचा अनुभव नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे. सुमारे २००० कॅडिडेटस् पुन्हा नाइलाज म्हणुन बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मी कधीच कुणालाच मॅनेज केलं नाही. पण थांबलो तर काय जातयं? बघु काय होतंय ते!

बिल गेटस्: ज्या कँडिडेटस् कडे मॅनेजमेंटचा डिप्लोमा नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे.
बॅड्लक म्हणुन ५०० कॅडिडेटस् बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मी १५ व्या वर्षीच शाळा सोडली, पण आता गमावण्यासारखं आपल्याकडे आहेच काय? आणि तो थांबतो.

शेवटी, बिल गेटस्: ज्यांना "सेरब्रो - क्रोट" बोलता येत नाही, अशांनी कॄपया बाहेर जावे... आणि ४९८ कॅडिडेटस् बाहेर पडतात.

मकरंद - स्वतःशी: मला तर "सेरब्रो - क्रोट" चा एक शब्दही येत नाही! पण म्हणुन काय झाल? आणि तो थांबतो.
आता त्या रुममध्ये मकरंद आणि दुसरा एक असे दोघेच उरतात.

बिल गेटस्: हां, तर फक्त तुम्ही दोघेच आहात ज्यांना "सेरब्रो - क्रोट" बोलता येतं. म्हणुन, आपण दोघांनी आता त्या भाषेत वार्तालाप करावा.

मकरंद शांतपणे, त्या दुसर्‍या कँडिडेट कडे वळुन विचारतो: "कोठुन आलास रे?"
दुसरा: पुण्याहुन!

........... तर, मानलं का नाही - आम्हा मराठी माणसांना!

तुमच आमचं कधीच सेम नसतं

मन म्हणजे मन म्हणजे मन असतं
तुमचं आमचं कधीच सेम नसतं..!

मन कधी चंचल असतं,
कधी अस्थिर असतं
पण दुसराच्या मनात काय असतं
हे कधीच कळत नसतं..

काहि जिंकायला कमी पडले तर,
जिंकण्याचं साधनही मनच असतं
आणि काहि मिळवायचे राहिलेच
तर सांत्वनालाही मनच असतं..

मन मोठ्ठं असतं,मन अरुंदही असतं
मोठया मनात बरचं काही मावतं
अरुंद मनात मन असं कधीच नसतं
तिथे फक्त अरुंद वाटेवरून चालायच असतं

काहि गोष्टी ज्यावर बिंबतात तेही मनच असतं
तर बरेच गोष्टी सोडून देणारही मनच असतं

संस्कार ज्यावर होतात तेही मनच असतं
पर्यायाने माणसाला घडविण्याचं साधनही मनच असतं

दिलखुलास हसविणारही मनच असतं
तर डोळ्यातून अश्रू आणणारही मनच असतं

बरेच गोष्टी मनात असतात
पण सर्वच बोलायचं नसतं
बोलता येत नसतं,पण म्हणून
मनातल्या मनात कधीच रडायचं नसतं

मन व डोकं यात बरचं अंतर असतं
मनाच्या निर्णयात डोकं लावलं
की ते वेगळचं वळण घेतं

म्हणून मनातल्या गोष्टीत
डोकं जरा जपूनच वापरायचं असतं
मात्र मन अयोग्य वाटेवर नेण्यास भाग पाडू शकतं
या बाबतीत मात्र डोकं चांगलचं वापरायचं असतं

असं हे मन म्हणजे मन असतं
तुमच आमचं कधीच सेम नसतं

Sunday, September 6, 2009

एक असंही प्रेम होतं…

“अम्या असं कसं झालं रे… नक्की काय म्हणाली ती?”
“तुला सांगितलं, तेच म्हणाली. आणि त्यानंतर काही बोलण्यासारखं राहिलंही
नव्हतं…’
“रागावू नकोस; पण मला पुन्हा एकदा सांगतोस काय झालं ते…’
“जवळपास गेला आठवडा आम्ही फारसे भेटत नव्हतो, हे तुला माहितीच आहे. तेव्हाही न
भेटण्याचं तसं विशेष काही कारण नव्हतं; पण भेट घडत नव्हती हे खरं… काल तिचा फोन
आला. आज नक्की भेटूया म्हणाली. मी नेहमीप्रमाणे तिला खेचू लागलो, तर ती खूप
सिरीअस वाटली. आवाजावरून रडल्यासारखी वाटत होती. मी कारण विचारलं तिला… तर
काहीच बोलली नाही… भेटल्यावर बोलू म्हणाली.’
“मग?’
“मग काय आम्ही भेटलो आज. काहीतरी गडबड आहे… काहीतरी विचित्र घडलंय किंवा घडणार
आहे असं मला सारखं वाटत होतं… आज मनूला भेटताना नेहमीसारखं मस्त नव्हतं वाटत…
म्हणजे इतर वेळी आम्ही भेटणार म्हटल्यावर जसं वाटायचं तसं नव्हतं वाटत. तुला
सांगता येत नाहीये आत्ता… म्हणजे काय वाटत होतं ते शब्दांत नाही सांगता येत…;
पण ते काहीतरी विचित्र फिलिंग होतं…’
“आम्ही आपल्या नेहमीच्या जागी भेटलो. तिचा चेहरा मलूल दिसत होता. फारसं बोलली
नाही ती. मी विचारलं तिला, “काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय नक्की?’ तर ती
म्हणाली, “तेच बोलायला आलोय आपण; पण आधी काहीतरी खाऊन घे… नेहमीप्रमाणे उपाशीच
असशील…’ मग आम्ही खायला मागवलं; पण ती नीट खात नव्हती. नेहमीप्रमाणे माझ्या
डिशमधला घासही घेतला नाही तिनं… अन्न चिवडत बसली होती फक्त… तुला गंमत सांगतो,
आज यांचं काहीतरी बिनसलंय हे आमच्या नेहमीच्या वेटरच्याही लक्षात आलं… त्यानं
तसं विचारलं सुद्धा… माझं खाणं झाल्यावर ती म्हटली, “चल पुलावर जाऊ…’
काय झालंय हे माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ती काही बोलायला तयार नव्हती… आम्ही
पुलावर जायला निघालो. आज बिल तिनं दिलं… तुला ठाऊक आहे, नेहमी बिल मीच देतो. पण
आज तिनं मला अडवलं आणि पैसे काढून दिले.
आम्ही पुलाकडे जायला निघालो. ती गाडीवर मागे बसली होती ना, तेव्हाही नेहमीसारखी
नव्हती बसली. माझ्या खांद्यावरच्या तिच्या हाताची थरथर मला जाणवत होती…
माझ्यासमोरचं प्रश्‍नचिन्ह वाढतच होतं…
आम्ही पुलावर पोचलो. मी गाडी लावली आणि आम्ही खाली बसलो. ती मान खाली घालून
बसली होती. तिला म्हटलं, बोल आता… काय झालंय ते सांगून टाक पटकन. आता माझा जीव
नको खाऊस… तिनं वर पाहिलं, तर डोळ्यात पाणी होतं तिच्या… तिनं पर्स उघडली आणि
मला एक पासबुक दिलं. “हे तपासून घे,’ म्हणाली. तुला माहीत नाही… मी तिला
प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचो. तिनं एक अकाउंट उघडलं होतं, त्यात ती ते
भरायची. त्यात स्वत:चीही भर घालायची. आमच्या संसारासाठीची बचत होती ती!
ते पासबुक हातात घेतलं आणि विचारलं, “काय भानगड आहे ही? मी तुला आजपर्यंत
त्याबाबत कधी विचारलंय का? आणि आज एकदम हे काय?’
तिनं माझा हात हातात घेतला… तिचा हात थरथरत होता. मी त्यावर थोपटलं… पाच-दहा
मिनिटं आम्ही तसेच स्वस्थ बसून राहिलो. मी तिला थोपटत होतो. तिनं मला विचारलं,
“तुझा विश्‍वास आहे माझ्यावर?’
मी म्हणालो, “मग कोणावर ठेवू?’
ती म्हणाली, “आपण लग्न नको करायला… का ते विचारू नकोस. मला नाही सांगता येणार;
पण आपण लग्न नको करायला…’
ती काय म्हणते आहे, हे मला कळलंच नाही कितीतरी वेळ… समजलं तेव्हा कशाचंच भान
नव्हतं राहिलं. माझा तिच्यावर पूर्ण विश्‍वास होता आणि आहे. ती तसं म्हणते
यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार… पण असं कसं होईल… ती माझ्याशिवाय आणि मी
तिच्याशिवाय कसे जगू शकू...? अक्षरश: काही समजत नव्हतं. कितीतरी वेळ आम्ही तसेच
सुन्न बसून होतो नदीकडे बघत आणि ती नदी आमच्या दोघांच्या डोळ्यातून वाहात होती.
बराच अंधार पडल्यावर आम्ही उठलो. तिला घरी सोडलं… आणि मी इथं तुझ्याकडे आलो…’
“अम्या, असं कसं होईल रे… ती का म्हणाली असं? तू विचारलं नाहीस तिला? मी विचारू
का?’
“नको. तू काही बोलू नकोस. मीही कधीच विचारणार नाही. माझा विश्‍वास आहे तिच्यावर
काहीतरी नक्की घडलंय…’
“अरे पण आपल्या ग्रुपला काय सांगायचं आता? आणि तू तुझ्या घरी काय सांगशील?’
राहुलच्या कोणत्याही प्रश्‍नाचं उत्तर देण्याच्या मनःस्थितीत अम्या नव्हताच. तो
केव्हाच हरवून गेला होता. अम्या हरवला होता, त्यापेक्षा राहुल जास्त हरवला
होता. हरवणारच होता तो… तो धक्काच तेवढा मोठा होता… अम्या आणि मनू काही थोडा
काळ एकमेकांसोबत नव्हते. लहानपणापासून ओळखत होते ते एकमेकांना. फक्त ओळखत
नव्हते, तर एकमेकांशिवाय ते कुठंही जात नव्हते की येत नव्हते. भांडणं आणि
मारामाऱ्याही तेवढ्याच जोरदारपणे करायचे. बरं दोघांच्याही शाळा वेगळ्या आणि
पुढे कॉलेजही वेगळी; पण एका शिबिरात ते भेटले आणि तेव्हापासून एकमेकांचेच झाले
होते. हे जे काही आहे, त्याला प्रेम म्हणतात, हे त्यांना दहावीच्या सुटीत
जाणवलं. ते पैसे साठवण्याचं खूळ तेव्हापासूनचं होतं. अर्थात त्यावेळी मनू एका
पिगी बॅंकेत पैसे टाकायची. अम्याच्या कॉलेजचा ग्रुप हसायचा कधीकधी त्यांना…
चेष्टाही करायचा; पण त्यांना त्यांच्या प्रेमाची, त्यांच्यामधील गाढ नात्याची
जाणीवही होती. थोडीथोडकी नाही, 12-14 वर्षं दोघं एकत्र होते. कॉलेज संपल्यावर
ती नोकरी करू लागली आणि हा व्यवसायात पडला. तेव्हाही याची अकाउंट्‌स तपासणं, तो
जेवला की नाही पाहणं यावर तिचं पक्कं लक्ष असायचं. त्यांची ती शेवटची भेट होती,
तेव्हाही तिनं आधी त्याला खायला लावलं होतं… अम्या कधी कसा वागेल, हे
तिच्याइतकं कोणीच सांगू शकायचं नाही आणि तिच्याबाबत अम्याला विचारून घ्यावं.
अम्या केव्हा रागावतो, त्याला काय काय आवडतं इथपासून ते आत्ता त्याच्या गाडीत
किती पेट्रोल आहे, तो बाहेरगावी गेला, तर किती वाजता कुठे असेल, घरी किती वाजता
पोचेल इथपर्यंत बारीकसारीक गोष्टी मनूला माहिती असायच्या. तशाच मनूच्या त्याला.
दोघं एकमेकांची प्रचंड काळजी घ्यायचे. कॉलेज वेगवेगळी असली, तरी अम्यानं कधी
कोणती लेक्‍चर्स बंक मारली, त्याचं कुठलं कुठलं कम्प्लिशन राह्यलं आहे, हे
मनूला बरोबर समजायचं. मग ती त्याच्या मागे लागून ते सारं करून घ्यायची.
या साऱ्या गोष्टी त्या दोघांच्या घरीही माहीत होत्या. म्हणूनच अम्याची तक्रार
मनूकडे आणि मनूची अम्याकडे व्हायची. दोघांनी घरी स्पष्ट सांगितलं नसलं, तरी
त्यांना कळत नव्हतं असं नाही. आणि त्यांचीही ना नव्हतीच! लहानपणापासून पाहात
आले होते ते दोघांना… अगदी “मेड फॉर इच अदर…’
मग आता हे अचानक झालं काय, हे राहुलला समजेच ना… अर्थात जिथं अम्यालाच काही
समजलं नव्हतं, तिथं राहुलला काय समजणार होतं? तरी राहुल विचार करतच होता; कारण
तिच्या आणि त्याच्या अशा दोघांच्याही ग्रुपला त्यालाच उत्तर द्यायचं होतं.
दोघांचा बेस्ट फ्रेंड होता तो. ते इतरांना “झाशा’ देऊन हुंदडायला गेले, तरी
त्याला मात्र खरंखरं सांगून जायचे. एकदा तर त्याला मनूच्या वडिलांनी विचारलंही
होतं… “अरे त्यांना म्हणाव सांगून टाका ना एकदा आम्हाला स्पष्ट. आम्ही काय नाही
म्हणणार आहोत का? असे किती वर्षं फिरणार आहात नुसतेच. आमच्या नातेवाइकांनाही
माहितीये सगळं. एकदा अक्षता टाकल्या, की आम्ही मोकळे… तू बोल रे त्यांच्याशी…’
राहुलपुढे हा एकच प्रश्‍न सतत उभा राहात होता, “हे अचानक काय झालं?’
दोन महिन्यातच मनूचं लग्न झालं. अम्या घरचं कार्य असल्यासारखा राबला त्या
लग्नात. राहुलला, त्याच्या ग्रुपला, एवढंच काय पण तिच्या घरच्यांनाही बघवत
नव्हतं त्याच्याकडे. तो आणि मनू एकमेकांसमोर यायचं टाळत होते. तसे आले असते, तर
बांध नक्कीच फुटला असता… लग्न लागलं. पंगती बसल्या. सगळा ग्रुप शेवटच्या पंगतीत
बसणार होता. तेव्हा अम्या बाहेर सटकला. पंगत उठली, तरी हा काही दिसला नाही
कोणाला. मनूची नजरही त्यालाच शोधत होती. तो उपाशी राहिलेला तिला अजिबात चालायचा
नाही… पण अम्या उगवला तो थेट पाठवणीच्या वेळी. अर्थात जेवला का नाहीस, हे
विचारण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, मनूचीदेखील… पाठवणीच्यावेळी मनू
त्याच्यासमोर आली. नवऱ्याशी ओळख करून दिली. हा अम्या. माझा सगळ्यात जवळचा
मित्र… त्यावेळी दोघांच्याही कंठात हुंदका अडला होता… फक्त दोघांच्याच नाही…
त्यांना ओळखणाऱ्या साऱ्यांच्याच….
अम्याला सावरायला काही दिवस लागले. मनूला तेवढा तरी वेळ मिळाला की नाही ठाऊक
नाही… मनू हनिमूनहून परत आली. आल्याआल्या तिनं पहिला फोन अम्यालाच लावला. तो
सापडला नाही म्हणून राहुलला. अर्थात लग्नानंतर ती राहुलच्या संपर्कात होतीच.
तिला अम्याची काळजी वाटत होती… पण अम्या काही तिला भेटायला तयार नव्हता. तिनंही
त्याला वेळ दिला. शेवटी तिच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनंतर ते भेटले… त्याच
नेहमीच्या जागी… नंतरही ते भेटत राहिले. अम्यासाठी चांगली मुलगी शोधण्याचा तिनं
आता चंगच बांधला होता. त्याला कोणती मुलगी शोभेल, हे तिच्याशिवाय दुसरं कोण
सांगू शकणार होतं?
पुढे अम्याही निवळला. त्याचंही लग्न झालं. आज अम्या आणि मनू आपापल्या संसारात
रमले आहेत. दोघांनाही पोरंबाळं आहेत. भेटीगाठी आता खूपच कमी झाल्यात. म्हणजे
सहा-सात महिन्यांतून एखादेवेळी वगैरे… तेव्हा मोबाईल नव्हते. आता आहेत. पण रोज
फोन किंवा एसएमएसही नसतो. त्या दोघांना तशी गरजही नाही. ती दोघंही त्यापलीकडे
कधीच गेली आहेत. आजही त्यांना एकमेकांबद्दल उत्तम माहिती असते. आपापल्या
जोडीदारांशी ते प्रामाणिक आहेत. कदाचित काहींना शंका येते, त्यांच्या “इतर’
संबंधांबद्दल… अर्थात त्याबाबत इतरांना दोष देण्यातही अर्थ नाही. 12-14 वर्ष
एकत्र राहिलेल्यांमध्ये असे संबंध निर्माण झाले नसतील, यावर कोण विश्‍वास
ठेवणार? पण विश्‍वास ठेवायला हवा. ते दोघंही एकमेकांच्या मनामध्ये इतके गुंतले
होते, की त्यांना या गोष्टी खरोखरच दुय्यम वाटत होत्या. कधीकधी ते दोघं तिच्या
किंवा त्याच्या घरी एकटेही असत; पण गाणी, गप्पा किंवा मारामाऱ्या याशिवाय दुसरं
काही त्यांच्यात घडलं नाही… कोणी यावर विश्‍वास ठेवो, न ठेवो, राहुल, त्या
दोघांचा ग्रुप आणि माझा मात्र पक्का विश्‍वास आहे. आम्ही सारे त्यांचं तर
उदाहरण सांगायचो साऱ्यांना… आजही सांगतो… हे असं का झालं, हे अजूनही साऱ्यांनाच
कोडं आहे. अम्यानं तिला हा प्रश्‍न आजही विचारलेला नाही आणि ती आपणहून
सांगेपर्यंत त्याला समजणारही नाही… अर्थात त्याला समजल्यानंतरही तो आम्हाला
सांगेल, असंही नाही…
एवढ्या कथेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की मी या साऱ्याचा साक्षीदार आहे. हे
सारं माझ्यासमोर घडलंय… मी ते माझ्या परीनं अनुभवलंय. मागे संदीप खरेच्या
कार्यक्रमाला गेलो होतो… तेव्हा एक गाणं ऐकलं
कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे, अपुले अंतर…
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्या नंतर…
या दोघांना किती चपखल लागू होतं नाही…
ही गोष्ट अनेक दिवस मनात होती. सांगावीशी वाटत होती. अम्या आणि मनूच्या सफल न
झालेल्या (खरंतर असं कसं म्हणणार? लग्नात परिवर्तन न झालेल्या, असं म्हणता येईल
फारतर…) प्रेमाची ही कहाणी आहे. कोणालातरी वाटेल, की ते दोघं आपापल्या
जोडिदारांना फसवत असतील. तर तसंही नाही. आपापला संसार ते उत्तम रीतीनं करतात.
आपापल्या संसाराला ते 100 टक्के देतात… आपलं प्रेम त्यांनी मनाच्या कुठल्यातरी
खोल कप्प्यात अगदी अंधारात ठेवलंय एवढंच…
आज इतक्‍या दिवसांनी मला हे सांगावंसं का वाटलं ठाऊक आहे? ते दोघं पहिल्यांदा
भेटले, त्याला नुकतीच 18 वर्षं पूर्ण झाली. आम्ही सारे, म्हणजे आमचा ग्रुप त्या
दिवशी भेटतो. अगदी पहिल्यापासूनचा रिवाज आहे हा. नेहमीच्या अड्ड्यावर आम्ही
भेटलो, प्रचंड दंगा केला. ती दोघंही हे सारं छान एन्जॉय करत होती. नेहमीप्रमाणे
सारं वातावरण होतं. जाताना मात्र ती आमचीही नजर चुकवून चटकन निघून गेली… डोळे
पुसत होती, असं प्राजू म्हणाली… इकडं अम्याचेही डोळे पाणावले होते… राहुलनं
सांगितल्यामुळे मलाही माहीत होतं, म्हणून त्याला सहज विचारलं, “अम्या, त्या
पासबुकाचं काय झालं रे?’ अम्या म्हणाला, “मी अजूनही तिच्याकडे पैसे पाठवतो.
तीदेखील तिची भर घालून ते पैसे त्याच अकाउंटमध्ये ठेवते… अरे आमचं झालं नाही
म्हणून काय झालं… आम्ही ठरवलंय पैसे साठवत राहायचे आणि एखाद्याचं पैशांमुळे अडत
असेल, तर त्याला न बोलता देऊन टाकायचे… तिच्या एका मैत्रिणीला अडचण होती,
तेव्हा आम्ही त्या कपलला ते पैसे देऊन टाकले. आमचा नाही झाला संसार… पण
दुसऱ्याचा उभा राहू शकला, याचा आनंद आहेच की!!!
मी बऱ्याचदा नातेसंबंधांवर लिहीत असतो. कधी नॉस्टॅल्जिक होतो. प्रत्येक
विषयानंतर माझी स्वत:ची काहीतरी कॉमेंट करतो. पण यावेळी नाही जमत तसं करायला.
खरंतर आज इतक्‍या वर्षांनंतर हे लिहितानाही मी तो काळ अनुभवतोय आणि शब्द
अडखळताहेत… होतंच… सॉरी आहेच… तसंच प्रेम आहे हे…

श्री गणेश वंदना ||

गौरीसुता शिवदूता
आज तुला मी वंदिते
मनापासुनी गणेशा
तुझी पूजा मी बांधिते

दुग्धजल अभिषेक
कुंकुमटिळा रेखिते
दुर्वा अन् जास्वंदास
भक्तिपूर्वक वाहते

दीपज्योती उजळोनि
मनास उजाळा देते
धुप दावुनि ओम्कारा
तुज प्रेमे आळविते

माझी साधी भावपूजा
तुज चरणी अर्पिते
नको अव्हेरुस आता
धर्मबंधु विनविते

तूच माय तात सखा
तुझी प्रार्थना करिते
चुकता घे समजोनि
हेच मागणे मागते !

दप्तर

अडगळीच्या खोलीमधलं
दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
...

मोहीम – शिवतीर्थ किल्ले राजगड

मैत्री आणि प्रेम

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री

मैत्री म्हणजे नेमके काय ? मैत्री म्हणजे मायेची सा

मैत्री म्हणजे मायेची साठवण..........

मनाने मनाला दिलेली

प्रेमाची आठवण.............

हा धागा निट जपायचा असतो..........

तो कधी विसरायचा नसतो............

कारण ही नाती तुट्त नाहित..........

ती आपोआप मिटून जातात............

जशी बोटावर रंग ठेवून

फ़ुलपाखरे हातून सुटून जातात...........

Saturday, September 5, 2009

उंदराने घातले एकदा किराणा दुकान,

किरायाने केले मांजराचे मकान.
उंदराचे दात जेव्हा लागले सळसळू,
चारच दिवसात पोते लागले गळू.
दुकानाला आली झाडावरची खार,
मागू लागली सामान उधार.
घुसला दुकानात पोपट हिवरा,
सामान आज म्हणे पैसे परवा.
नंतर आला डोलदार उंट,
मागू लागला फुकट सुंट.
मग आला लबाड कोल्हा,
उंदराच्या दुकानाचा गिर्याहिक झाला.
आता आला ढेरीवाला हत्ती,
पाहिजे याला उधार चहापत्ती.
मोर बसला येउन समोर,
चोरी करून पाळला चोर.
नंतर आला पांढरा कोंबडा,
अहो तो तर फारच चोंबडा.
मागितला त्यानं थोडासा रवा
उंदीर म्हणाला कशाला हवा ?
दुकानाला आले सर्व भरदार,
पण पैसायाने होते सर्वच उधार.
दुसर्याच दिवसी माल नेला चोराने
रोजचाच गल्ला चार रुपय चाराने.
उंदराने नंतर खाल्ला गुलकंद,
आणि म्हणाला आता दुकान बंद.
- रमेश ठोंबरे

हसु नका !

एकदा एक मुलगी रक्शाबंधनच्या दिवशी राखी घेउन आली...
मि College कट्टयावर बसलो होतो,
ति माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हात पुढॆ कर, मला राखीबांधायची आहे तुला ,
मी म्हणालो मुळीच नाही.
ति म्हणाली काय झालं ? काय झालं ? काय Problem आहे ?
मी म्हणालो वा! ग वा! शहाणीच आहेस की, उद्या मी मगंसुञ आणतो, तु घेशील का
बांधुन ?
ती काही न बोलता, सरल गप्प निघुन गेली

ASHI BAYAKO ASAVI ..

तुला जेंव्हा माझी गरज भासेल

असा चालतो शेअर बाजार !!!

*एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्‍यांना सांगितले की त्याला माकडे
पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्‍यांना दहा रुपये देईल.
गावकरी खुश झालेत व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागलेत.
माकडे पकडायला गावकर्‍यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो
माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा.
काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्‍यांना
सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्‍यांनी बाजुच्या जंगलातुन
माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत.
काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड
खरेदी केलेत कारण गावकर्‍यांना माकडे सापडेनात.
आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी
त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला ," मी काही दिवसांत
जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा
करावी व तो त्यांचे पैसे देईल.
माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्‍यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत
नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्‍यांना देईल व तो माणुस
शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात
म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल.
गावकर्‍यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना
माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर
गावकर्‍यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड
दिसु लागलेत.*

माझं पाऊल वळलं होतं

भावनाशुन्य जगावं लागेल हे आधीच कळलं होतं
पुढची संकटं ओळखून आधीच पाऊल वळलं होतं

तुझ्या जाण्याने फ़ारसं दु:ख झालं नाही कदाचित
तुझं जाणं तुझ्याआधीच मला कळलं होतं

मनातल्या आठवणींचा वृक्ष हलला होता जरासा
पिवळं होण्याआधीच तुझं पान गळलं होतं

यार कसले जपले तेही उलटलेच शेवटी
मरण्याआधीच त्यांनी माझं सरण जाळलं होतं

कुठल्याही कंपूत मला सामील केले नाही कोणी
मी येण्याआधीच माझं त्यांनी नाव गाळलं होतं

त्यांच्या प्रासादात बोलावणं नव्हतं तरी गेलो होतो एकदा
पण जा म्हणण्याआधीच माझं पाऊल वळलं होतं

-- सौरभ

तुझं भेटणं !!!!!!

बरं वाटलं तू आलीस !
आज भेटलीस
!!

रात्री माझ्या बागेत
,
रातराणी फ़ुलली होती

कारण नसताना, उगाचचं

ती बडबड करत बसली होती
!
तेव्हाच यायला हवं होतं लक्षात
,
आज तू भेटणार
,
इतके दिवस कुठे होतास म्हणून

भांड भांड भांडणार

भांडून भांडून दमल्यावर
,
माझाचं हात हातात धरून
,
पुन्हा माझ्याचं खांद्यावर डोकं टेकणार
!!!!

पुन्हा मुक्यानेच होइल संभाषण पलं

पुन्हा पानं फ़ुलं एकतील
आणि मग पुन्हा तुझ्या गालावर
लाजेचे ताटवे फ़ुलतील
!!

जाताना मात्र नको विचारूस

पुन्हा कधी भेटायचं

असचं , अवचित , कधीतरी
रातराणी सारखं फ़ुलायचं !!!!!!!
- मुरलीधर परुळेकर.

ने मजसी ने

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सागरा
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ सॄष्टिची विविधता चल पाहू
त़इं जननीहृद विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पॄष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी ये़ईन त्वरे कथूनि सोडले तिजला सागरा प्राण तळमळला, सागरा
शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी ही फ़सगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तेजोमय होती
गुण सुमने वेचियली मी या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उध्दरणी , व्यय ना तीच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रव्रॄक्षवत्सलता , रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता, रे फ़ुलबाग मला हाय, पारखा झाला सागरा प्राण तळमळला, सागरा

नभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य , परी मज भारी आ़ईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा वनवास तिच्या जरी वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे बहू जिवलग गमते चित्ता, रे
तुज सरिस्पते जी सरिता, रे त्वदविरहाची शपथघालितो तुजला सागरा प्राणप्र

या फ़ेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऎसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिउनि का आंग्लभूमी ते
मन्मातेला अबला म्हणुनि फ़सविसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे, अबला ना माझी ही माता रे,
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा प्राण तळमळला, सागरा

गीत : स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत : पं. हॄदयनाथ मंगेशकर
स्वर : मंगेशकर बंधू – भगिनी

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला

“अग्गोबाई-ढग्गोबाई” या अल्बममधल्या “दूर देशी गेला बाबा” या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून “दमलेल्या बापाची ही कहाणी तुला” हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. “आयुष्यावर बोलू काही” च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:

(सलीलचा आवाज) पद्य:
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला….
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना….

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला….
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना….

(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला….
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना…

(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला….
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना….

(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं

(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना….

- संदीप खरे