Saturday, September 5, 2009

माझं पाऊल वळलं होतं

भावनाशुन्य जगावं लागेल हे आधीच कळलं होतं
पुढची संकटं ओळखून आधीच पाऊल वळलं होतं

तुझ्या जाण्याने फ़ारसं दु:ख झालं नाही कदाचित
तुझं जाणं तुझ्याआधीच मला कळलं होतं

मनातल्या आठवणींचा वृक्ष हलला होता जरासा
पिवळं होण्याआधीच तुझं पान गळलं होतं

यार कसले जपले तेही उलटलेच शेवटी
मरण्याआधीच त्यांनी माझं सरण जाळलं होतं

कुठल्याही कंपूत मला सामील केले नाही कोणी
मी येण्याआधीच माझं त्यांनी नाव गाळलं होतं

त्यांच्या प्रासादात बोलावणं नव्हतं तरी गेलो होतो एकदा
पण जा म्हणण्याआधीच माझं पाऊल वळलं होतं

-- सौरभ

No comments:

Post a Comment