आज तुला मी वंदिते
मनापासुनी गणेशा
तुझी पूजा मी बांधिते
दुग्धजल अभिषेक
कुंकुमटिळा रेखिते
दुर्वा अन् जास्वंदास
भक्तिपूर्वक वाहते
दीपज्योती उजळोनि
मनास उजाळा देते
धुप दावुनि ओम्कारा
तुज प्रेमे आळविते
माझी साधी भावपूजा
तुज चरणी अर्पिते
नको अव्हेरुस आता
धर्मबंधु विनविते
तुझी प्रार्थना करिते
चुकता घे समजोनि
हेच मागणे मागते !
No comments:
Post a Comment