काळा रंग एकदा पांढरयावर रुसला
तू चांगला, मी वाईट , कोपर्यात जाऊन बसला
समजूत काढावी कशी पांढ़र्यालाकळेना, ..
सुटलेली मैत्री, नव्याने जुळेना....
पांढरयाचं साकड़ देवाने एकलं...
रात्रीला एकदा रजेवर टाकलं..
माणूस राहिला जागा, घुबडालाही दिसेना...
काळोखाशिवाय कोणी आणि काही मागेना...
देवानी मग एक, अजुन केली मजा...
केसांना दिली पिकण्याची सजा..
पांढरया केसांखाली सुंदर काही दिसेना...
काळे केस सोडून कुणी काही मागेना...
गंमत म्हणून त्यानी गायब केली माती..
खायला झाला कहर आणि ओस पडली शेती..
भूकेपुढे दूसरा विचार मनात टिकेना....
काळया मातीशिवाय, कुणी काही मागेना...
काळे काळे ढ़ग करून टाकले नीळे...
ओस पडला गाव, पाण्यावीना तळे...
उन्हाची धग, काहीकेल्या सरेना...
काळे ढ़ग सोडून कुणी काही मागेना...
देव म्हणाला हळूच...'मला दोडके कुणी नाहीत...
तू कुठे, कुठे आहेस तुलाच नाही माहित..
दूसरा मोठा म्हणुन कुणी इथे हरेना...
एकाची जागा कुणी दूसरा कधी भरेना'....!!!!!!!!!
तू चांगला, मी वाईट , कोपर्यात जाऊन बसला
समजूत काढावी कशी पांढ़र्यालाकळेना, ..
सुटलेली मैत्री, नव्याने जुळेना....
पांढरयाचं साकड़ देवाने एकलं...
रात्रीला एकदा रजेवर टाकलं..
माणूस राहिला जागा, घुबडालाही दिसेना...
काळोखाशिवाय कोणी आणि काही मागेना...
देवानी मग एक, अजुन केली मजा...
केसांना दिली पिकण्याची सजा..
पांढरया केसांखाली सुंदर काही दिसेना...
काळे केस सोडून कुणी काही मागेना...
गंमत म्हणून त्यानी गायब केली माती..
खायला झाला कहर आणि ओस पडली शेती..
भूकेपुढे दूसरा विचार मनात टिकेना....
काळया मातीशिवाय, कुणी काही मागेना...
काळे काळे ढ़ग करून टाकले नीळे...
ओस पडला गाव, पाण्यावीना तळे...
उन्हाची धग, काहीकेल्या सरेना...
काळे ढ़ग सोडून कुणी काही मागेना...
देव म्हणाला हळूच...'मला दोडके कुणी नाहीत...
तू कुठे, कुठे आहेस तुलाच नाही माहित..
दूसरा मोठा म्हणुन कुणी इथे हरेना...
एकाची जागा कुणी दूसरा कधी भरेना'....!!!!!!!!!
No comments:
Post a Comment