तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.
तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची....कारण ती माझी.....लाडकी मैत्रिण होती.....
तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.
एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.
आजकाल कोणाशी मैत्री करायची देखील भिती वाटते.कारण ज्याना आपण आपले मानतो,तिच व्यक्ती शेवटी तोडून जाते...तोडने किती सोप्पे असते,पण जाणाऱ्यांना त्याची काही किंमत नसते.ते हरवून जातात या विश्वाच्या पसाऱ्यात....ठेवून जातात मना मध्ये आठवणींचे मोरपंख,दुखऱ्या जागाना ह्ळुवारपणे स्पर्श होवून,जखमा अधिक सुगंधी करण्यासाठी.....मी आजही वाट पाहतोय तिच्या परत येण्याची,ती अशीच विश्वाच्या पसाऱ्यात हरवली आहे,की तिच्या कोशात ते तिला माहित...पण खात्री आहे एक ना एक दिवस ती नक्की परत येईल...पुन्हा भांडण करण्यासाठी.मीही तिची आतुततेने वाट पाहतो आहे,तिला पुन्हा पिडण्यासाठी......कारण ती माझी........
Sunday, March 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment