प्रत्येक जूनी गोष्ट
जपून ठेवलीयं मी
माझ्या विरलेल्या क्षणांना
धरून ठेवलयं मी.
माझा शाळेचा गणवेष?
माझ्या कपाटात जपून आहे,
माझं फाटलेलं दप्तर?
माळ्यांवर पडून आहे.
छान लिहिलं होतं बाईंनी,
एकदा निबंधावर माझ्या,
त्या निबंधाची पान अजून पलटतो मी.
निबंध लिहिणारा जूना मी,
त्यालाही जाऊन भेटतो मी.
गावाला नेणारी धुरवाली गाडी
हिरव्या हिरव्या शेतांनी बहरतो मी,
गावांत सारवलेलं घरं आमचं,
शेणांच्या वासानी हुरळतो मी.
ओफिसमध्येही अचानक
कोलेजच्या प्रेमात पडतो मी,
फ्रेंडशीप डे ला रंगवलेला शर्ट
अजूनही घालून मिरावतो मी.
वेळात वेळ काढून जेंव्हा
मित्रांशी चाट करतो मी,
ओफिसातल्या पोश खूर्चीला
कोलेज कट्टा समजतो मी.
माझ्या आठवणींचं जग
तूला एकदा तरी दाखवायचं होतं,
पुन्हा तुझ्याबरोबर जगण्यासाठी
ते जीवापाड जपलं होतं.
तू गेलीस तेंव्हा
मला काहीच समजत नव्हतं
स्मृतींच्या सठवणींचं
काय करू उमगतं नव्ह्तं
पण, आता तूझ्या बरोबरच्याही
क्षणांची केलीयं साठवणं मी
आठवणीत तूझ्या विसरून स्वतःला
उरलोय केवळ एक आठवण मी.
No comments:
Post a Comment