Saturday, September 5, 2009

दूरदेशी गेला बाबा

दूरदेशी गेला बाबा… गेली कामावर आई

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला

चार भिंतित धावुन दिसभर दमवला

‘ आता पुरे ! झोप सोन्या..’ कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?

कोणी बोलायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?

खेळ ठेवले मांडून … परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही

दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही

फार वाटे जावे परी – मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा……

- संदिप खरे

आम्ही!

जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही

फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही

तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही

कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही

दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही

जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…

- एल्गार, सुरेश भट

बरे नाही!

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही

ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही

आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही

कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही

मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…

- एल्गार, सुरेश भट

व. पु. प्रेमींसाठी...

चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात.

विनोद

"विनोद"

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?

कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

भिमाबाईंना डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी घोडदौडीचा सल्ला दिला.........महिनाभर रपेट केल्यावर त्यांनी वजन करुन पाहीले तर चक्क २० किलो कमी.........घोड्याच.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.

डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?
अण्णा : डॉ. देशपांडे.
डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा..........

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

शिक्षक : बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?

चिन्टु : पान नं. १७ ते ४२.

-----------------------------------------------------------------------

शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?
चिन्टु : हो
शिक्षक : कोणत्या ?
चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .

------------------------------------------------------------------------

विकी : बाबा मला दहा रुपये द्या लवकर, बाहेर एक गरीब माणुस सारख ओरोडतोय .
बाबा : काय ?
विकी : 'आइस क्रीम' घ्या 'आइस क्रीम'....

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं अफेअर जोरात चाललं. सगळ्या जंगलात या प्रकरणाची चर्चा गाजत राहिली. अखेर हत्तीनं डासिणीच्या वडिलांना भेटून तिला रीतसर मागणी घातली. पण, तिच्या घरच्यांनी लग्नाला प्रचंड विरोध दर्शवला.... का?....

....

सांगा सांगा का?

अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक आहे, मुलाचे दात फार पुढे आहेत!''

तरीही, घरच्यांच्या विरोधाला जुमानता दोघांनी लग्न केलं. पण, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू झाला...

...
का?...

...

विचार करा...

अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती!!!!

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?

नन्या : गांधीजींचा जन्म झाला.

चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?

नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

चौखुरे गुरुजी वर्गाला उद्देशून म्हणाले, ''बाळांनो, वर्गात जर कुणाला सुसु लागली असेल, तर त्याने करंगळी वर करावी.''

नन्या एकदम 'ट्टॉक' करून उद्गारला, ''आयला, गुरुजी, करंगळी वर केली की थांबते सुसु?!!!!''

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

अमेरिकेहून परतलेला देसी अमेरिकन कसा ओळखावा? या काही खुणा.
. दुधाच्या पाकिटावर त्यात किती टक्के चरबी आहे, याचा आकडा शोधतो.
. 'झेड'ला 'झी' म्हणतो.
. तारीख/ महिना/ वर्ष अशी तारीख लिहिता महिना/ तारीख/ वर्ष अशी लिहितो.
. इंडियन स्टँडर्ड टाइम आणि भारतीय रस्त्यांची स्थिती यांची सतत टर उडवतो.