Sunday, March 14, 2010

मुलीचें जिवन हे असचं असतं

मुलीचें जिवन हे असंच असतं

तुझं आनि तिच सारखंच असतं

ज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतं

त्याच कुटुंबाला सोडून जायचं असतं

ज्याने आईचे बोट धरून चालण शिकायचं असतं

त्याच बोटाने कुंकू लावून निघायचं असतं

ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळून मोठ व्हायचं असतं

त्याच खांद्यावर डोकं ठेवून रडायचं असतं

ज्या बहीण भावाला भांडून रड्वायचं असतं

त्यांनाच सोडून जाताना रडायचं ही असतं

सासूराला जाताजाता उंबरठ्या मधे

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामधे



--

आई वडिलांना विसरु नका

दुसरं सारं काही विसरा

,परंतु आई वडिलांना विसरु नका

त्यांचे उपकार अगणित आहेत

, त्यांना विसरु नका

त्यांनी असाह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण हे जग पाहु शकलो

जसे कराल तसे भराल ही भवना विसरु नका

.

ज्यांनी स्वता झिजुन तुम्हास मोठे केले त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असे वागु नका

.

ज्यांनी तुमच्या मार्गावर सदा प्रेमाची फ़ुलेच पसरली त्यांच्या मार्गातले काटे बनु नका

पैसे खर्चून सारं काही मिळेल पण आई वडिल मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा

त्यांच्या गरजा पुर्ण करण्यास विसरु नका

.त्याच्या पुज्य चरणांची आठवण ठेवा

त्यांना कधीही विसरु नका

.......

परमनंट ऍड्रेस !

विचारलाच कुणी तुला
कधी तुझा पत्त्ता
तर खुशाल कर वर्णन
दूरदेशीच्या एखाद्या ठिकाणाचं
तुझा "प्रेसेंट ऍड्रेस" म्हणून

पण जेव्हा कधी होईल विचारणा
तुझ्या "परमनंट ऍड्रेस" ची
तेव्हा मात्र बोल भरभरून
माझ्या हृदयाबद्दलच
कारण तू असणारच आहेस तिथं
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
किंवा त्यानंतरही कदाचित
कित्येक जन्म !

मुन्ना बागुल

फार आता फार झाले

फार आता फार झाले
श्वास घेणे भार झाले

पेटता वणवे तमाचे
सूर्य सारे गार झाले

सज्जना त्या जलसमाधी
घोर पापी पार झाले

पाय धरती एकदा,मग
पाच वर्षे स्वार झाले

"शांतिवार्ता सफल झाल्या"
आणि त्यांचे वार झाले!

आमचे इतिहास अंती
'पानपतची हार' झाले!

काय गल्ली,काय दिल्ली
नागवे बाजार झाले

माझी तू त्याची होताना

माझी तू त्याची होताना

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना

मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?

एकाच वाटेचे पक्शी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

जपून ठेवलय मी.

प्रत्येक जूनी गोष्ट

जपून ठेवलीयं मी

माझ्या विरलेल्या क्षणांना

धरून ठेवलयं मी.

माझा शाळेचा गणवेष?

माझ्या कपाटात जपून आहे,

माझं फाटलेलं दप्तर?

माळ्यांवर पडून आहे.

छान लिहिलं होतं बाईंनी,

एकदा निबंधावर माझ्या,

त्या निबंधाची पान अजून पलटतो मी.

निबंध लिहिणारा जूना मी,

त्यालाही जाऊन भेटतो मी.

गावाला नेणारी धुरवाली गाडी

हिरव्या हिरव्या शेतांनी बहरतो मी,

गावांत सारवलेलं घरं आमचं,

शेणांच्या वासानी हुरळतो मी.

ओफिसमध्येही अचानक

कोलेजच्या प्रेमात पडतो मी,

फ्रेंडशीप डे ला रंगवलेला शर्ट

अजूनही घालून मिरावतो मी.

वेळात वेळ काढून जेंव्हा

मित्रांशी चाट करतो मी,

ओफिसातल्या पोश खूर्चीला

कोलेज कट्टा समजतो मी.

माझ्या आठवणींचं जग

तूला एकदा तरी दाखवायचं होतं,

पुन्हा तुझ्याबरोबर जगण्यासाठी

ते जीवापाड जपलं होतं.

तू गेलीस तेंव्हा

मला काहीच समजत नव्हतं

स्मृतींच्या सठवणींचं

काय करू उमगतं नव्ह्तं

पण, आता तूझ्या बरोबरच्याही

क्षणांची केलीयं साठवणं मी

आठवणीत तूझ्या विसरून स्वतःला

उरलोय केवळ एक आठवण मी.

दोस्ता, कुठे बेपत्ता झालास?

दोस्ता, कुठे बेपत्ता झालास?
बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही!

भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू,
व्होड्का मिळेलच तिथे; नाही तर ओल्ड मंक सांगू,
अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ,
आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!


कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र,
प्रश्नांचा नाही तुटवडा, हवे तर बेळगाव मांडू,
मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ,
डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू,

दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

नवे साहित्य, जुने वाङ्मय, विदेशातील संमेलन,
कवितांचे तेच तेच, कथांमध्ये तर नाहीच दम,
कादंबरीत ना कस, असंतोष यांच्यात नाही दिसत,
नव्या सांस्कृतिक धोरणाचा यासंबंधी निकाल करू,

दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये, नाटकं केवळ पेपरांत,
पथनाट्ये सुरवातीलाच बरी, संगीत उरले समुहात,
फैज आणि गालीबची फेरउजळणी एकदा करू,
शहरीकरणात सांस्कृतिकतेची, नवी जाणीव जमवून पाहू

दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

चौथा पेग होईल तेव्हा चिकन चिली संपली असेल,
जेवणाची गरज नसेल म्हणून आणखी एक निप मागवू,
उठताना क्रेडिट कार्डाऐवजी, बिल दोघंही शेअर करू,
आपल्याच 'सच्चेपणा'ला आपणच सलाम ठोकू,


अन्
दोस्ता, भेट पुन्हा एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!!!